शिवरायांचे नाव घेता....


शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला llधृll
शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला l
पळाला पळाला कोथळा टाकून पळाला l
शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ll1ll

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला l
पळाला पळाला बोटे टाकून पळालाl
शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला ll2ll

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला l
पळाला पळाला टोप्या टाकून पळाला l
संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला ll3ll

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला l
पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला l
ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला ll4ll

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला l
पळाला पळाला तलवार टाकून पळाला l
तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला ll5ll

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला l
पळाला पळाला वेडा सोडून पळाला l
मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला ll6ll

llपुण्यश्लोक छत्रपती श्री.शिवाजी महाराज की जयll
llधर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज की जयll
llभारत माता की जयll
llहिंदू धर्म की जय ll

टिप्पण्या

  1. शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । शिवरायांचे नांव घेता अफझल्या पळाला ।। पळाला पळाला कोथळा टाकुन पळाला । शिवरायांचे नांव घेता अफझल्या पळाला ।।१।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । शिवरायांचे नांव घेता शाहिस्त्या पळाला ।। पळाला पळाला बोटं टाकून पळाला । शिवरायांचे नांव घेता शहिस्त्या पळाला ।।२।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । आणि संभाजीचे नांव घेता औरंग्या पळाला ।। पळाला पळाला मैदान सोडुन पळाला । संभाजीचे नाव घेता औरंग्या पळाला ।।३ ।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । संभाजीचे नांव घेता सिद्दी जोहर पळाला ।। पळाला पळाला जंजिऱ्यात पळाला ।

    संभाजीचे नांव घेता सिद्दी जोहर पळाला ।।४।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । संभाजीच्या पराक्रमाने पोर्तुगीज पळाले ।। पळाले पळाले तोफा टाकुन पळाले । संभाजीचे नांव घेता पोर्तुगीज पळाले ।।५ ।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । तारा राणींचे नांव घेता औरंग्या पळाला । पळाला पळाला स्वप्न तोडुन पळाला । ताराराणींच्या पराक्रमाने औरंग्या पळाला ।।६ ।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आल गळ्याला । महाराष्ट्र मराठा म्हणत म्हणत औरंग्या बुडाला ।। बुडाला बुडाला कायमचा बुडाला । बुडाला बुडाला महाराष्ट्रातच बुडाला । मराठ्यांच्या पराक्रमाने एकदाचा बुडाला ।।७ ।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । तानाजींचे नांव घेता उदयभान पळाला ।। पळाला पळाला तलवार टाकुन पळाला । तानांजीचे नांव घेता उदयभान पळाला ।। ८ ।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । मुरारबाजींचे नांव घेता दिलेरखान पळाला ।। पळाला पळाला टोपी टाकुन पळाला । मुरारबाजीचे नांव घेता दिलेरखान पळाला ।।९।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । प्रताप रावांचे नांव घेता बहलोलखान पळाला ।।

    पळाला पळाला शस्त्रे टाकुन पळाला । प्रताप रावांचे नाव घेता बहलोलखान पळाला ।।१०।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । पृथ्वीराजाचे नांव घेता महंमद घोरी पळाला ।।

    पळाला पळाला तेरा वेळा पळाला । पृथ्वीराजाचे नांव घेता महंम्मद घोरी पळाला ।।११।।

    शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । कवी कलशचे नांव घेता शहाबुद्दीन पळाला ।। शरयु नदीला पुर येता पाणी आलं गळ्याला । हिन्दुस्थानचे नांव घेता पाकिस्तान पळाला ।। पळाला पळाला टोप्या टाकून पळाला । हिन्दुस्थानचे नांव घेता पाकिस्तान पळाला ।। ।१३ ।।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

गलबला रं गलबला