मर्द आम्ही हिन्दू खरे

मर्द आम्ही हिन्दू खरे

मर्द आम्ही हिन्दू खरे, दुश्मनांना भरे कापरे
देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे  ।।धृ।।

भारता आम्ही तुलाच देव मानतो
तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो
राखतो महान आमुची परंपरा
रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा
याच भूमीवरी प्राण गेला तरी
आमुची वीर गाथा उरे ।।१।।

व्हा पुढे आम्हा धनाजी बाजी सांगती
विरहो उठा कडाडतात नौबती
राजपूत ना कधी संगरी हटे
मारुनी दहास एक मरहट्टा कटे
सिंधू ओलांडूनी धावीती संगिनी
पाय आता ना मागे फिरे।।२।।

वादळा परी आम्ही पुढेच धावतो
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
विजय घोष दुमधूमे पुन्हा दिगंतरी
पूर्वजांपरी अजिंक्य दिव्य संगरी
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी
मृत्यू आम्हापुढे घाबरे।।३।।

⛳पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय।
⛳धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।
⛳भारतमाता की जय।
⛳हिंदू धर्म की जय।

⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान*⛳

⛳ *राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसुर्य जाळ*⛳

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला