गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, वरच्या आळीला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शेजारला, निरोप धाडीला, मोहिमेची न्याहरी माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शिंप्याला, निरोप धाडीला, मोहिमेचा शेला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या लोहाराला, निरोप धाडीला, मोहिमेचा भाला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या माळ्याला, निरोप धाडीला, फुलांचे हार माझ्या गडाच्या दाराला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा