चला ऽ रं उठा ऽ रं

चला ऽ रं उठा ऽ रं शेतकरी दादा कामकरी दादा ॥ध्रु॥
भारतमाता आपुली आई सापाचा विळखा पडलाय पायी
गरूड होन सोडवुया तिजला चला ऽ ॥१॥
भगवा झेंडा आज आमुचा रंग तयाचा फिक्का पडला
रक्ताच्या रंगाने रंगवुया त्याला चला ऽ ॥२॥
रामचंद्राने लंकेस नेला श्रीकृष्णाच्या रथी फडकला
देवादिकांचा झेंडा पुजायला चला ऽ ॥३॥
सिंहगडावर ताना गेला पावन खिंडीत बाजी पडला
शिवरायाचा हुकुम पाळायला चला ऽ ॥४॥
राघोबादादानं अटकेस नेला धारकर्यांनी त्याला पुजला
प्रणाम कराया साऱ्यांनी त्याला चला ऽ ॥५॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला