आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना

आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना ||ध्रु||
सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला ||१||
परिसाच्या संगे लोह बिघडले
लोह बिघडले सुवर्णची झाले ||२||
सागराच्या संगे नदी बिघडली
नदी बिघडली सागरची झाली ||३||
गुरुजींचिया संगे आम्ही बिघडलो
आम्ही बिघडलो धारकरींची झालो ||४||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

शिवरायांचे नाव घेता....