नौजवान सैनिका उचल पाउला
नौजवान सैनिका उचल पाउला
पुढे चला पुढे चला ध्वनि निनादला॥ध्रु॥
पुढे चला पुढे चला ध्वनि निनादला॥ध्रु॥
मायदेश आपुला स्वतंत्र जाहला
उच्च किर्तीशिखरि चढविण्यास त्याजला
व्हा तयार व्हा हुशार घोष जाहला ॥१॥
उच्च किर्तीशिखरि चढविण्यास त्याजला
व्हा तयार व्हा हुशार घोष जाहला ॥१॥
शिवाजी शूर बाजि वीर बापु गोखले
प्रताप थोर समरवीर अमर जाहले
ती उदात्त भव्य दिव्य स्मर परंपरा ॥२॥
प्रताप थोर समरवीर अमर जाहले
ती उदात्त भव्य दिव्य स्मर परंपरा ॥२॥
टिळक केशव नरेंद्र थोर अग्रणी
रंगले स्वदेशकार्यी स्वार्थ त्यागुनी
त्यासमान देव मान देश आपुला ॥३॥
रंगले स्वदेशकार्यी स्वार्थ त्यागुनी
त्यासमान देव मान देश आपुला ॥३॥
मार्ग तव तुला जरी भयाण वाटला
विपत्तिचा गिरी जरी समोर ठाकला
बेधडक तू दे धडक नि फोड त्याजला ॥४॥
विपत्तिचा गिरी जरी समोर ठाकला
बेधडक तू दे धडक नि फोड त्याजला ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा