जय जय भारत हाच असू दे

जय जय भारत हाच असू दे मंत्र मुखी दिनरात ॥ध्रु॥
प्रभात काळी रोज सकाळी भारतभूची गा भूपाळी
भारतभूचे स्तोत्र घुमू दे रोज तुझ्या सदनात ॥१॥
हा रघुनंदन राम तुझा रे हाच मुरारी श्याम तुझा रे
विटेवरचा हाच विठोबा प्राण हाच हृदयात ॥२॥
इतिहासाचे कर पारायण जाण तुझे तू ते रामायण
कर्तव्याची जाणिव गीता हीच असो स्मरणात ॥३॥
निजरक्ताचे लावुन कुंकुम वाहुन चरणी देहाचे सुम
प्राणांचीही उजळ प्रसंगी आरतीस फुलवात ॥४॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला