सुवर्ण सिंहासन का?

सुवर्ण सिंहासन का?

सभासद बखरीमध्ये शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे जे वर्णन केले आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचा मागोवा घेतल्याशिवाय सुवर्ण सिंहासनाचा अन्वयार्थ कळू शकत नाही.

सभासद लिहितो...
पुढे वेदमूर्ती राजेश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले...त्यांस राजे व सरकारकून सामोरे जाऊन, भेट घेऊन सन्मानें आणिलें...गागाभट्ट बहुत संतुष्ट जाहले. भट गोसावी यांचे मतें, मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात...आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळविले असतां त्यांस तक्त नाहीं... याकरितां मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें आणि तें राजियासही मानिलें... पुढें तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे सिद्ध करविलें. नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केलीं...जडीत सिंहासन सिद्ध केले...सिंहासनास अष्ट खांब जडीत केले...अष्ट खांबी अष्टप्रधान उभे केले...पूर्वी कृतयुगी, त्रेतायुगी, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैसलें...त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त सर्वही साहित्य सिद्ध केलें...छत्र जडावाचे मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिलें. छत्रपती असे नाव चालवले. कागदीं पत्रीं स्वस्तिश्री राज्याभिषेक शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालवले...येणेप्रमाणे सिंहासनारूढ जालें. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाहीं.

"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा...मऱ्हाटा राजा छत्रपती जाला, ही गोष्ट सामान्य जाली नाही" या शेवटच्या वाक्यात सुवर्ण सिंहासनाचे माहात्म्य सामावलेले आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षें महाराष्ट्रावर आणि संपूर्ण हिंदुस्थानावरच सर्वत्र क्रूर, जुलमी अशा इस्लामी सत्ताधीशांच्या राजवटी होत्या. देवगिरी, वारंगळ, कर्णावती, विजयनगर इत्यादी सर्व हिंदू राज्यकर्त्यांची सिंहासने लयाला गेली होती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सर्व इस्लामी सत्तांना उघड्या मैदानात घनघोर रणसंग्राम करून, चारी मुंड्या चीत करून, शिवछत्रपतींनी रायगडावर बत्तीस मण सुवर्ण सिंहासनावर आरूढ होऊन हिंदूंचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे सुवर्ण सिंहासन म्हणजे केवळ राजाचे बसण्याचे आसन नव्हते तर हिन्दु समाजास संजीवनी देणारी मात्राच ठरले. या सुवर्ण सिंहासनाने मराठयांच्या मनांत आत्मविश्वास निर्माण झाला की आपण मोठे स्वप्न पाहू शकतो आणि स्वकर्तृत्वावर ते साकार पण करू शकतो.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत राहिलेल्या हिन्दु समाजाची अशी धारणाच झाली होती की राज्य करण्याचा अधिकार केवळ मुस्लिमांनाच आहे. हिंदूंनी केवळ त्यांचे गुलाम म्हणून जगावे. तसेच या सर्व इस्लामी राज्यकर्त्यांची देखील अशीच दृढ धारणा होता की अल्लाने या पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार केवळ मुस्लिमांनाच दिला असून काफरांनी आपले स्वामित्व मान्य करून केवळ आपले गुलाम म्हणून जगावे. याला धक्का देण्याचे काम कोणी केले असेल तर ते केवळ शिवछत्रपतींनी. हिंदूंच्या स्वाभिमानाचे, आत्मसन्मानाचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणजे ते सुवर्ण सिंहासन.

महाराजांनी जणू सर्वच जुलमी इस्लामी सत्ताधीशांना असा इशाराच दिला की हिन्दु समाज देखील उत्तम राज्यकर्ते निर्माण करू शकतो, उत्तम तऱ्हेने प्रशासनव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि संरक्षणव्यवस्था सांभाळू शकतो. व्यापार, उद्योग, कृषी यांना प्रोत्साहीत करून सर्वोत्कृष्ठ राज्य चालवू शकतो.

सुवर्ण सिंहासनावर आरूढ होण्यामागे शिवछत्रपतींची नेमकी काय भूमिका असेल बरे???

स्वतःचे कोडकौतुक करवून घेण्याची वृत्ती महाराजांच्या ठायीं मुळीच नव्हती. राजेपद हे केवळ ईश्वरदत्त असून, राज्यमदारूढ न होता, प्रजेचे सेवेसाठी अप्रमत्त वृत्तीने राज्य करण्याची त्यांची पद्धत होती. समर्थ रामदासांनी तर महाराजांना "श्रीमंत योगी" अशी उपाधी दिलेली आहे. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये महाराजांची भूमिका नेहमीच "उपभोगशून्य स्वामी" अशीच राहिलेली आहे. त्यामुळे मोठेपणा मिरवण्यासाठी महाराजांनी बत्तीस मण सोन्याचे सिंहासन नक्कीच निर्मिले नव्हते. मग यामागे महाराजांची नेमकी धारणा काय होती???

याचा शोध घ्यायचा असेल तर महाराजांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांचे संदर्भ ध्यानात घ्यावे लागतील.

शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी शहाजीराजांनी त्यांच्या पुणे जहागिरीत स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला होता. परंतु आदिलशाहाने तो धुळीस मिळवला. पुण्यातील वाडेहुडे पेटवून देण्यात आले. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविला. पुण्यावर स्मशानकळा आणली. पुण्यात वसती करण्यास देखील बंदी होती. शेती, व्यापार, उद्योग, व्यवसाय हे करणे तर दूरची गोष्ट.

या परिस्थितीमधून पुण्याची मुक्तता केली शिवछत्रपतींनी. त्यांनी पुण्याची भूमी सोन्याच्या नांगराने नांगरली. का बरं सोन्याचा नांगर?...नांगरट तर लोखंडाच्या नांगराने उत्तम होते की...तरी पण सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली याचे कारण लोकांचा मृतवत झालेला स्वाभिमान जागृत करणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते. महाराजांनी त्या काळातील हिंदूंच्या अंतःकरणात हा विश्वास उत्पन्न केला की ते सर्व क्षेत्रांत उत्तम तऱ्हेने काम करू शकतात...किंबहुना जुलमी इस्लामी शासकांपेक्षा देखील उत्तम काम करू शकतात.

राज्याभिषेकाच्या वेळी देखील सुवर्ण सिंहासनावर आरूढ होऊन त्यांना हाच संदेश द्यायचा होता.

या निमित्ताने सर्व जुलमी इस्लामी राज्यकर्त्यांना महाराजांनी जणू संदेशच दिला की हिंदू लोक उत्तम राज्यकर्ते होऊ शकतात...किंबहुना जुलमी इस्लामी सत्ताधीशांपेक्षा देखील उत्तम राज्यव्यवहार करू शकतात. राज्याच्या सर्व विभागांत उत्कृष्ठ काम करू शकतात आणि राजांचा राजा म्हणजे छत्रपती निर्माण करू शकतात.

महाराजांनी स्वकीयांना पण संदेश दिला की आपल्यात काहीही कमी नाही. आपण कर्तृत्वाच्या बळावर कोणतेही अवघड काम यशस्वी करू शकतो हा आत्मविश्वास या सुवर्ण सिंहासनाच्या निमित्ताने महाराजांनी हिंदू समाजाच्या मनांत उत्पन्न केला.

या हेतू ध्यानात घेऊनच आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने हे सुवर्ण सिंहासन पुनर्प्रस्थापित करण्याचा संकल्प केला आहे. शिवतीर्थ श्रीरायगडावर लाखो धारकरी जमून दिनांक 4 जून 2017 ला हा संकल्प सोडला आहे.

हा संकल्प सोहळा आजच्या हिंदुस्थानला विश्वात स्वतःचे अभिमानाचे, कर्तृत्वाचे स्थान निर्माण करण्याची प्रेरणा होईल यात शंकाच नाही.

सुवर्ण सिंहासन निर्मितीच्या या उपक्रमात सहभागी होणे हे प्रत्येक हिंदुमात्राचे अत्यंत पवित्र असे आद्य कर्तव्यच आहे. यासाठी आवश्य सर्पक करा ..

हे राष्ट्रकार्य आपल कर्तव्य समजून सर्वांनी सडळ हातांनी सुवर्ण सिंहासना फूल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करावी.

।। राष्ट्रांत निर्मू अवघ्या श्रीशिवसुर्यजाळ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला