जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
- जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
- रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
- एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
- भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
- जय जय महाराष्ट्र माझा ...
- भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
- अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
- सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
- दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
- काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
- पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
- दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
- देशगौरवासाठी झिजला
- दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा