धेय आपुले साध्य करु


नगर ग्राम अन वस्ती वस्ती शिवशक्तिचे केन्द्र करु
परिश्रमाने पराक्रमाने धेय आपुले साध्य करु ॥धृ॥
इतिहासाचा बोध घेउनि निज स्वार्थाला दूर करु
हिन्दुत्वाचा विसर न व्हावा अशी साधना नित्य करु
भगवा झेंडा गुरु आपुला रोज तयाला नमन करु ॥१॥
भेद भावना कुणी निर्मिली चर्चा आता व्यर्थ असे
संघ भावना मनात रुजता समरसता ही सहज दिसे
भारत भू चे सुपुत्र सारे मातेचा जयकार करु ॥२॥
राष्ट्र संकटी चहु दिशान्नी भय घंटा ही वाजत असे
धर्म संस्कृति राष्ट्र ग्रासणे कुटिल अरीचा डाव असे
दिशा दिशान्नी सरसाओनि स्वत्व रक्षणि सार्थ करु ॥३॥
नाद घालति गिरि कन्दरी बन्धू अपुले हेच दुखि
अर्पुन अपुले तन मन धन हे जीवन त्यांचे करु सुखि
जन्म अपुला राष्ट्रा साठी शंभू पंथे गमन करु ॥४॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला