शिवरायांचे नाव घेता....
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला llधृll
शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला l
पळाला पळाला कोथळा टाकून पळाला l
शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ll1ll
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला l
पळाला पळाला बोटे टाकून पळालाl
शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला ll2ll
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला l
पळाला पळाला टोप्या टाकून पळाला l
संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला ll3ll
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला l
पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला l
ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला ll4ll
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला l
पळाला पळाला तलवार टाकून पळाला l
तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला ll5ll
शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l
मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला l
पळाला पळाला वेडा सोडून पळाला l
मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला ll6ll
llपुण्यश्लोक छत्रपती श्री.शिवाजी महाराज की जयll
llधर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज की जयll
llभारत माता की जयll
llहिंदू धर्म की जय ll
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा