पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गलबला रं गलबला

इमेज
गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, वरच्या आळीला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शेजारला, निरोप धाडीला, मोहिमेची न्याहरी माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या शिंप्याला, निरोप धाडीला, मोहिमेचा शेला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या लोहाराला, निरोप धाडीला, मोहिमेचा भाला माझ्या शिवबा राजाला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला, शेजारच्या माळ्याला, निरोप धाडीला, फुलांचे हार माझ्या गडाच्या दाराला, गलबला रं गलबला, कस्सला गलबला, शंभूबाळ जन्मला रं, शंभूबाळ जन्मला,       ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

शिवरायांचे नाव घेता....

शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला llधृll शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला l पळाला पळाला कोथळा टाकून पळाला l शिवरायांचे नाव घेता अफझल्या पळाला ll1ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला l पळाला पळाला बोटे टाकून पळालाl शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला ll2ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला टोप्या टाकून पळाला l संभाजींचे नाव घेता औरंग्या पळाला ll3ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला l पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला l ताराराणींचे नाव घेता औरंग्या पळाला ll4ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला l पळाला पळाला तलवार टाकून पळाला l तानाजींचे नाव घेता उदयभान पळाला ll5ll शरयु नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला l पळाला पळाला वेडा सोडून पळाला l मुरारबाजींचे नाव घेता दिलेरखान पळाला ll6ll llपुण्यश्लोक छत्रपती श्री.शिवाजी

सुवर्ण सिंहासन का?

इमेज
सुवर्ण सिंहासन का? सभासद बखरीमध्ये शिवछत्रपतींच्या  राज्याभिषेकाचे जे वर्णन केले आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचा मागोवा घेतल्याशिवाय सुवर्ण सिंहासनाचा अन्वयार्थ कळू शकत नाही. सभासद लिहितो... पुढे वेदमूर्ती राजेश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले...त्यांस राजे व सरकारकून सामोरे जाऊन, भेट घेऊन सन्मानें आणिलें...गागाभट ्ट बहुत संतुष्ट जाहले. भट गोसावी यांचे मतें, मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात...आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळविले असतां त्यांस तक्त नाहीं... याकरितां मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें आणि तें राजियासही मानिलें... पुढें तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे सिद्ध करविलें. नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केलीं...जडीत सिंहासन सिद्ध केले...सिंहासना स अष्ट खांब जडीत केले...अष्ट खांबी अष्टप्रधान उभे केले...पूर्वी कृतयुगी, त्रेतायुगी, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैस

गुरुजींविषयी थोडे काही !

'संभाजीराव भिडे गुरूजी' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी. पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे! दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी य

शिवसूर्यहृदय

||शिवसूर्यहृदय|| जधीं दाटतो पूर्णतः अंधकार| दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर|| अश्या संकटी कोणी ना घाबरावे| शिवाजी चरित्रास भावें स्मरावे||१|| असंख्यात गेले विरोधात लोक| तरी घालणे ना यमाला ही भिक|| जरी सागरा एवढे म्लेंछ आले| शिवाजी आणि मावळे नाही भ्याले||२|| करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेऊ| असा सह्य निर्धार चितांत ठेऊ|| शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले| जगी हिंदवी राज्य निर्माण केले||३|| सुखाला आधी लाथ मारा धृतीने| उठा मार्ग चाला कड़या निश्चयाने|| जगी गांडूळा सारखे ना जगावे| उरी बाजीतानाजीला संस्मरावे||४|| नका भिक घालू कधी संकटाला| उठा ठोकरा येई ते ज्या क्षणाला|| मनाला नसावा कधी भीती स्पर्श| जिजाऊसुतांचा जगया आदर्श||५|| महामंत्र आहे न्हवे शब्द साधा| जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा|| नुरे देश अवघा जयांचे अभावी| शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी||६|| जिथे मोगरा तेथे राहे सुवास| जिथे कृष्ण तेथे जयश्री निवास|| शिवाजी जपु मंत्र आर्त मतिनी| शिवाजी तिथे माय तुळजाभवानी||७|| चहु बाजूने वादळे घेरतील| कुणीही सवे सोबतीला नसेल|| दिशा वाट सर्वस्वी ही हारविता| शिवाजी

दौडीचे श्लोक

⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न⛳ श्री दुर्गामाता दौडीमध्ये तोंडपाठ म्हणावयाचे काही श्लोक. रोज एकदा तरी मोठ्याने म्हटल्यास पाठ होऊन जातील. अंधारातही सर्व पाहु शकती, ऐसे आम्हा नेत्र दे। अग्नीलाही बसेल स्पर्श करिता, चटका असें चित्त दे।। निद्रा भूक तहान सर्व ईशणा, गिळण्या मनीं शक्ति दे। अंबे दे शिवसूर्यसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।। अंबे दे शिवपुत्रसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।। _____________________________________ नभासारिखें चित्त देई विशाल। तसें जान्हवी सारिखे शुद्ध शील।। रवी सारिखी बुद्धि तेजस्वी देई। प्रभु मागणे अन्य तें काहीं नाही।। आई मागणे अन्य ते काहीं नाही।। _____________________________________ व्याकूळ चित्त अमुचे तव दर्शनार्थ। आशिष देई जननी बनण्या कृतार्थ।। झुंझार राष्ट्र करण्या अवघ्या जगांत। जगदंब वास कर तूं आमच्या उरांत।। _____________________________________ आतूर धावत आलो, तव दर्शनाला। शिवबा समान मतिं हॄद द्युति दे आम्हाला।। शिवतेज ठासून भरू, जनशोणितांत। करू हिन्दुराष्ट्र बलदंड, उभ्या जगांत।। _____________________________________ आम्हां ऐंक

धेय आपुले साध्य करु

नगर ग्राम अन वस्ती वस्ती शिवशक्तिचे केन्द्र करु परिश्रमाने पराक्रमाने धेय आपुले साध्य करु ॥धृ॥ इतिहासाचा बोध घेउनि निज स्वार्थाला दूर करु हिन्दुत्वाचा विसर न व्हावा अशी साधना नित्य करु भगवा झेंडा गुरु आपुला रोज तयाला नमन करु ॥१॥ भेद भावना कुणी निर्मिली चर्चा आता व्यर्थ असे संघ भावना मनात रुजता समरसता ही सहज दिसे भारत भू चे सुपुत्र सारे मातेचा जयकार करु ॥२॥ राष्ट्र संकटी चहु दिशान्नी भय घंटा ही वाजत असे धर्म संस्कृति राष्ट्र ग्रासणे कुटिल अरीचा डाव असे दिशा दिशान्नी सरसाओनि स्वत्व रक्षणि सार्थ करु ॥३॥ नाद घालति गिरि कन्दरी बन्धू अपुले हेच दुखि अर्पुन अपुले तन मन धन हे जीवन त्यांचे करु सुखि जन्म अपुला राष्ट्रा साठी शंभू पंथे गमन करु ॥४॥

अमुचा ध्वज डोले गगनात

सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात ॥ध्रु॥ रामचंद्र अन् श्रीकृष्णाची प्रताप राणा अन् शिवबाची पराक्रमी या हिंदुत्वाची धगधगती ही ज्योत ॥१॥ पराक्रमाला ही साजेशी वैभव झळके दिव्य दशदिशी अविरत राहो भव्य भविष्यी एकच आम्हा साथ ॥२॥ स्वार्थ निराशा आज चहुंकडे केवळ जगणे जिणे बापुडे उत्तर याला कार्य रोकडे संघटनेचा हात ॥३॥ युगयुग आघात साहिले देव दानवांना नच चुकले संस्कृतिचे परि तसेच उरले प्रतीक हे विश्वात ॥४॥ इतिहासाची पाने उलटू क्षितिजाच्याही सीमा पलटू जगद्गुरूसिंहासन गाठू डुलेल ध्वज डौलात ॥५॥

या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल

या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥ श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ॥१॥ जाती पन्थ भाषा नको वृथा अभिमान भेदांच्या भिंती पडोत सर्व जळुन निद्रेतुन जागा हिन्दुस्थान ते तेज जगाला निःसंशय दिपवील ॥२॥ आसाम असो पंजाब असो बंगाल तो महराष्ट्र वा कर्नाटक तामिळ हा अखन्ड भारत परि आसेतु हिमाचल विविधतेतुनि एकता इथे प्रकटेल ॥३॥ हा समाज आपुला ध्येयापासुनि ढळला हिन्दूच हिन्दुच्या विरोधात उठलेला परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला कष्टाने आमुच्या देशभक्त होइल ॥४॥ राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील परकीय शक्तिला साथ कुणी देतील बलदण्ड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देतील हा संघ शक्तिचा साक्षात्कार घडेल ॥५॥

वेदमंत्राहून आम्हां वंद्य

                वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥ वेदमंत्राहून आम्हां, वंद्य वंदे मातरम्‌ , वंद्य वंदे मातरम्‌ ॥ध्रु॥ माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती । त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती । आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ ॥१॥ याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले । शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले । शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम्‌ ॥२॥ निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी । ते हुतात्मे देव झाले, स्वर्गलोकी जाउनी । गा तयांच्या आरतीचे, गीत वंदे मातरम्‌ ॥३॥

युद्धभेरी गर्जती

युद्धभेरी गर्जती दुंदुभी निनादती संगरार्थ शूरवीर चालले रणाप्रती ॥ध्रु॥ भारतीय अस्मिता, नीतिधैर्य, शांतता शत्रु ठाकला पुढे, दानवीय क्रूरता मृत्युदंड त्याजला ध्येय एक संप्रती ॥१॥ कंठकंठ छेदणे, शत्रुसैन्य तोडणे सार्वभौम भारता सार्वभौम राखणे विजय स्वप्न भूमिचे, पेशी पेशी वाहती ॥२॥ सर्व धर्म मिळवुनी एक सौख्य चालते एकराष्ट्र भावना, अंतरात नांदते स्फूर्तिदायी चेतना अणुअणूत जागती ॥३॥ कुटिल नीति ठेवणे राष्ट्रकार्य जाहले भीम पार्थ होउनी, भारतीय ठाकले विकसनार्थ भूमिच्या रुधिरपाट वाहती ॥४॥

राष्ट्राचा करु पुनरुद्धार॥

देश धर्म अनं संस्कृतिचा आपण सारे राखू मान जीवन-पुष्प समर्पण करुनी राष्ट्राचा करु पुनरुद्धार॥ लोकसागरी मिसळुनी जाता जनगंगांन्ना एक करु हिन्दुत्वाच्या संदेशाने अखिल विश्व एकात्म करु कण कण भारु चैतन्याने चंदनही फुलवी अंगार ॥१॥ हो राष्ट्राचा करु पुनरुद्धार... समाजातले दोष निपटुनी समरसतेचा भरुया भाव ध्येयसाधना संघटनेची त्यासाठी ही अविरत धाव घेउ प्रतिज्ञा आपण सारे राष्ट्रशक्तिचा हो आधार ॥२॥ हो राष्ट्राचा करु पुनरुद्धार... लोकमनावर संस्काराने नवमानव जगती घडवू जीवनमूल्यांच्या वर्षावे स्वर्ग धरेवर उभा करू हृदयमंदिरी ध्येय देव हो यातच जीवन हो साकार ॥३॥ हो राष्ट्राचा करु पुनरुद्धार...

भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित

भरतभूमीच्या हृदयांतरीचे इप्सित पूर्ण करावे समर्पणातून अमुच्या येथे राष्ट्र महान घडावे शतशतकांची उसासणारी मनी अस्फुट वेदना पराभवाची गाथा गाते उदासवाणी करुणा दीर्घकालचे शल्य हरावे मनीचे आर्त पुरावे ॥१॥ आज चालली कितिक पाऊले ध्येयपथावरती परिश्रमातुन यांच्या येईल स्वर्ग धरेवरती धारकाऱ्यांच्या सामर्थ्याने हिणकस दुरित जळावे ॥२॥ या भूमीचे दैन्य हरावे कुणीही नसावे पतित कणकण येथील सुवर्ण व्हावा निर्झर अमृत भरीत श्रीरामाच्या देशामध्ये पावन मंगल व्हावे ॥३॥

श्री गुरुची, मी पूजा बांधियली

भक्तिभावे श्री गुरुची, मी पूजा बांधियली जीवनाची पुष्पकमले, या ध्वजाला वाहिली ॥ध्रु॥ मानवाचा धर्म माझा, हीच माझी प्रेरणा संत-मुनि-ऋषि येथ वदले, विश्व एकच भावना राष्ट्रभक्तीने उभी ही, संघशक्ती आपुली ॥१॥ ईश्वराचे कार्य माझे, मग मला भय कोणते याच कामी देह येवो, जीवना साफल्य ते तृप्त होइल अंतरात्मा, जर पुजा स्वीकारली ॥२॥ त्यागमय तू पथ प्रदर्शक, शांतिचा अन् क्रांतिचा स्फूर्ति देसी तुच सकला, मार्ग दावी प्रीतिचा प्रथम राष्ट्राच्या ध्वजाला, दक्षिणा अर्पीयली ॥३॥

युगायुगातिल हे सिंहासन

युगायुगातिल हे सिंहासन आज पुन्हा जाहले सचेतन ॥ परंपरेचे अमुच्या उज्वल संस्कृतिचे हे प्रतीक मंगल भारतीय हृदयातिल झाले स्वप्न आज साकार चिरंतन ॥१॥ स्तब्ध जाहली जनता सारी सत्तेला मद चढला भारी लोकपाल म्हणुनीच जन्मला विष्णु इथे घेई सुदर्शन ॥२॥ अनुशासित सरभाव करोनी चेतविला राष्ट्रधर्म वन्ही प्रखर तपाचरणातुन झाला प्रकट आज का मंगल शुभदिन ॥३॥ झाले दण्डित दुष्ट अधम खल उदण्ड झाले संध्येस्तव जल धर्माधिष्टित राज्याचे हे आज खरोखर पुनरुथ्थान ॥४॥ सिंहासन हे विक्रमशालि चिरगौरव युत वैभवशालि होण्यास्तव हे अपुले येथे चला करा सर्वस्व समर्पण ॥५॥

तुझाच जयजयकार

तुझाच जयजयकार घुमवित दुंदुभी तुतारिचा ललकार हा विराट पुरुषा तुझाच जयजयकार॥ध्रु॥ कोटिकोटि तव स्फुल्लिंगातुन शिवशक्तीचा प्रत्यय येउनि संस्कृतिचा गंगौघ निर्मुनी हा घडे समष्टीजीवन साक्षात्कार॥१॥ ध्वज भगवा सद्गुरू सनातन फडकत गगनी राही चिरंतन केले ज्यांनी जीवन अर्पण हा उठे तयांचा भूमीतूनि पुकार॥२॥ छातिस भिडली छाती जेथे धूळ चारली शत्रूस इथे भूमिरक्षणी पडले जेथे हा तेथुन उठला अंतरिचा हुंकार॥३॥ अंतःकरणी तेच प्रतिध्वनि तोच एक स्वर उठवू गगनी हो सिद्ध या विजयदिनी हा रणचंडीचा रौद्ररूप अवतार॥४॥

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥ भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥ सागरा प्राण तळमळला शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ सागरा प्राण तळमळला नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥ सागरा प्राण तळमळला या फेनमिषें हससि निर

रणी फडकती लाखो झेंडे

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्रिविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ॥ शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड हृधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी राम रणांगणी मग दावी ॥ कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला कृष्णकारणी क्षणही न कधि धर्माचा हा ध्वज दिसला चोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे श्वासाश्वासा सह सत्याचे संचरती जगती वारे गगनमंदिरी धाव करी मलिन मृत्तिका लवण धरी नगराजाचा गर्व हरी ॥

नौजवान सैनिका उचल पाउला

नौजवान सैनिका उचल पाउला पुढे चला पुढे चला ध्वनि निनादला॥ध्रु॥ मायदेश आपुला स्वतंत्र जाहला उच्च किर्तीशिखरि चढविण्यास त्याजला व्हा तयार व्हा हुशार घोष जाहला ॥१॥ शिवाजी शूर बाजि वीर बापु गोखले प्रताप थोर समरवीर अमर जाहले ती उदात्त भव्य दिव्य स्मर परंपरा ॥२॥ टिळक केशव नरेंद्र थोर अग्रणी रंगले स्वदेशकार्यी स्वार्थ त्यागुनी त्यासमान देव मान देश आपुला ॥३॥ मार्ग तव तुला जरी भयाण वाटला विपत्तिचा गिरी जरी समोर ठाकला बेधडक तू दे धडक नि फोड त्याजला ॥४॥

जय जय भारत हाच असू दे

जय जय भारत हाच असू दे मंत्र मुखी दिनरात ॥ध्रु॥ प्रभात काळी रोज सकाळी भारतभूची गा भूपाळी भारतभूचे स्तोत्र घुमू दे रोज तुझ्या सदनात ॥१॥ हा रघुनंदन राम तुझा रे हाच मुरारी श्याम तुझा रे विटेवरचा हाच विठोबा प्राण हाच हृदयात ॥२॥ इतिहासाचे कर पारायण जाण तुझे तू ते रामायण कर्तव्याची जाणिव गीता हीच असो स्मरणात ॥३॥ निजरक्ताचे लावुन कुंकुम वाहुन चरणी देहाचे सुम प्राणांचीही उजळ प्रसंगी आरतीस फुलवात ॥४॥

हिन्दुराष्ट्र हे अखंड अमुचे

हिन्दुराष्ट्र हे अखंड अमुचे अखंड जीवन धार भिन्न प्रांत आचार भिन्न जरि एकचि परि संस्कार ॥ध्रु॥ हिंदुभूमी ही पुण्य पुरातन कणकण येथिल मंगल पावन हिंदुहृदयीचे चिर संवेदन होय स्वयंसाकार ॥१॥ इथेच वेदांचे अमृतरव मर्यादापुरुषोत्तम राघव श्रीकृष्णाचे गीतावैभव गांडिव करि टंकार ॥२॥ मानबिंदुचे करण्या रक्षण अंतरिच्या त्या स्फुल्लिंगातुन संघशक्तिचे घडवू दर्शन छेदुन घन अंधार ॥३॥ याच व्रतास्तव जीवन अमुचे दिव्य कार्य अविरत करण्याचे मूर्त रूप हे नवराष्ट्राचे घडविल साक्षात्कार ॥४॥

एक हे वरदान

एक हे वरदान आई एक हे वरदान दे संभ्रमी पार्थास या गीतेवरी तू जाण दे ॥ध्रु॥ तू जगाची जन्मदा तू वीरप्रसवा माउली तू अनादी थोरवी तव देवतांनी गाइली आज आम्हा हिंदु मी हे सांगण्या अभिमान दे ॥१॥ विस्मृतीने लोपलेल्या अस्मितेला जाग दे प्रलकारी भैरवाचा क्रोध रणराग दे अंतरी वेदांतले ते पुण्यपावन ज्ञान दे ॥२॥ हिन्दु हिन्दु एक अवघा भावना ही जागवी देशभक्तीची चिरंतन ज्योत हृदयी चेतवी नित्य अधरी आमुच्या तव कीर्तीचे यशगान दे ॥३॥ दाटता नैराश्यतम तू स्फूर्तिचा आलोक दे विसरता पथ साधनेचा जागृतीची हांक दे संकटांचा पंथ दे पण पार करण्या त्राण दे ॥४॥ तव पुरातन वैभवाचे स्वप्न नित या लोचनी केशवाने दाविलेले ध्येय अमुच्या जीवनी पूर्ण व्हाया ते करी या राघवाचा बाण दे ॥५॥ eka he varadāna āī eka he varadāna de

हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना

हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना ॥ध्रु॥ तूच देव मंदिरात भाव तूच या मनी शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥ ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥ स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो आयु सर्व वाहिले पदी तुझ्याच पावना ॥३॥

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ॥ध्रु॥ हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण आई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार ॥१॥ धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ॥२॥ स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचे आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ॥३॥ पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार ॥४॥ प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याची घेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ॥५॥ कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती परी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती ॥६॥

चला ऽ रं उठा ऽ रं

चला ऽ रं उठा ऽ रं शेतकरी दादा कामकरी दादा ॥ध्रु॥ भारतमाता आपुली आई सापाचा विळखा पडलाय पायी गरूड होन सोडवुया तिजला चला ऽ ॥१॥ भगवा झेंडा आज आमुचा रंग तयाचा फिक्का पडला रक्ताच्या रंगाने रंगवुया त्याला चला ऽ ॥२॥ रामचंद्राने लंकेस नेला श्रीकृष्णाच्या रथी फडकला देवादिकांचा झेंडा पुजायला चला ऽ ॥३॥ सिंहगडावर ताना गेला पावन खिंडीत बाजी पडला शिवरायाचा हुकुम पाळायला चला ऽ ॥४॥ राघोबादादानं अटकेस नेला धारकर्यांनी त्याला पुजला प्रणाम कराया साऱ्यांनी त्याला चला ऽ ॥५॥

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥ निशाण भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळिज धडके मावळे आम्हीच लढणार ॥१॥ तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा परि नाही धीरच सोडणार ॥२॥ धनाजी जाधव रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब बघता घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥ बाजीराव तो वीरच मोठा कणसं खानि लढला पठ्ठा घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥ जगदंबेच्या कृपाप्रसादे शिवरायाच्या आशीर्वादे म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥

आम्ही पुत्र अमृताचे

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे ॥धृ॥ पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही गझनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही आम्ही काळपुत्र आम्हा ये ईल मरण कैसे ॥१॥ हे राष्ट्र संकटंशी लढले अनेक वेळा कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो नभाला त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे ॥२॥ जरी काळकूट प्यालो तरी नाही मृत्यु आला अग्नीत पद्मीनीचा जळतो कधी न आत्मा दाहीर कन्यकांचे जरि देह आज नुरले आत्मे तरी तयांचे अतीदिव्यरूप झाले ते प्राण आमुचे अन् आम्ही प्राण या जगाचे ॥३॥ ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना जी काली रूप घेते दुष्टास शासताना या मा ऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे ॥४॥

आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना

आम्ही  बि-घडलो तुम्ही बिघडांना ||ध्रु|| सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद्गुरुची झाला ||१|| परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले ||२|| सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली ||३|| गुरुजींचिया संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो धारकरींची झालो ||४||

हिंदू सारा एक

हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ॥ध्रु॥ उच्चनीचता तण जाळावे धगधगत्या कर्त्रुत्वाने समाज रसरसता अर्वाचिन पुनः निर्मुया यत्नाने खचलेला अभिमान जागवू पिचली ह्रुदये सांधूया ॥१॥ कोणी नाही शत्रू आपूला प्रेमाने अवकाश भरु चारित्र्याच्या आधारावर हिंदूराष्ट्र हे नव उभवू समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया ॥२॥ सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा अन्न-वस्त्र-संस्कार लाभही सहजपणे सर्वा लाभावा हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालूया ॥३॥ निज सत्वाची जाणिव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे परंपरा, इतिहास, पराक्रम आठव नुसाता व्यर्थ असे कोटी मनांना सवे घेऊनी वैभव सारे मिळवू या ॥४॥ समाजभक्ति हीच प्रेरणा राष्ट्रभक्ति हे रुप तिचे देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तिचे विचार येतील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया ॥५॥ आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची माय भूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्त्रुत्वाची अग्निपरिक्षा कोणॊ घेता सुवर्ण तेजे तळपुया ॥६॥

आम्ही हिंदू

                      आम्ही हिंदु आम्ही हिंदु ही तर आमची स्वभाविक ललकारी रे राष्ट्रभक्तीची विराट शक्ती प्रकटे जागृत भारी रे ॥ मायभूमीच्या कणाकणाचे प्रेम आमुचे प्राणपणाचे मायभूमीचि सर्व लेकरे समान आम्हा प्यारी रे ॥ ही समता ना ओठावरती बंधुत्वाची हृदयी ज्योती पहा पहा ही फाडुनी छाती फिटेल शंका सारी रे ॥ परंपरांचा मान राखतो क्षुद्र रुढींचे हीण जाळतो नव्या युगाचे शिल्प कोरिता अयोग्य उडवू दूरी रे ॥ संतजनांच्या अध्यात्माची वीरवरांच्या हौतात्म्याची दिव्य प्रेरणा परमार्थ्याची स्वार्थ अहंता मारी रे ॥ संघटनेने बळ साधावे दारिद्रयाचे पाश तुटावे समर्थ मंगल जीवन अमुचे विश्वास्तव शुभकारी रे ॥

उठा राष्ट्र्वीर हो

उठा राष्ट्र्वीर हो उठा राष्ट्र्वीर हो सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला॥धृ॥ युध्द आज पेटले जवान चालले पुढे मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे एकसंघ होउनि लढू चला लढू चला उठा उठा, चला चला ॥१॥ लाख संकटे जरी उभी समोर ठाकली मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली थोर वंश आपुला महान मार्ग आपुला उठा उठा, चला चला॥२॥ वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला उठा उठा, चला चला ॥३॥ चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू शूरता शिवाजिची नसानसात साठवू दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला उठा उठा, चला चला ॥४॥ यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला उठा उठा, चला चला ॥५॥  

इन्द्र जिमि जंभपर

इन्द्र  जिमि जंभपर इन्द्र जिमि जंभपर , वाडव सुअंभपर |  रावन सदंभपर , रघुकुल राज है || 1 ||  पौन बरिबाहपर , संभु रतिनाहपर |  ज्यो सहसबाहपर , राम द्विजराज है || 2 ||  दावा द्रुमदंडपर , चीता मृगझुंडपर |  भूषण वितुण्डपर , जैसे मृगराज है || 3 ||  तेजतम अंसपर , कन्हजिमि कंसपर |  तो म्लेंच्छ बंसपर , शेर सिवराज है || 4 ||   

महाराष्ट्र गीत

महाराष्ट्र गीत बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। धृ ।। गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे । आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे । अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे । तेथ अडे काय जलाशय – नदाविणे ।। पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा ।। प्रिय अमुचा …. ।। १ ।। प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे सदभावांचीच भव्य दिव्य आगरे । रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे । रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे । शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा ।। प्रिय अमुचा …. ।। २ ।। नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे । चतुरंग चमूचेही शौर्य मावळे । दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले । भासति शतगुणित जरी असति एकले । यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।। प्रिय अमुचा …. ।। ३ ।। विक्रम वैराग्य एक जागि नांदती । जरिपटका भगवा झेंडाहि डोलती । धर्म-राजकारण समवेत चालती । शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती । पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा ।। प्रिय अमुचा …. ।। ४ ।। गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो । स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो । वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो । सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो । देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।

वेडात मराठे वीर दौडले सात!

वेडात मराठे वीर दौडले सात! म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात!